नऊ लाखांच्या चोरीप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल
बाजार समितीमधील अडत दुकानातील घटना लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका अडत दुकानातील ९ लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी शहर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत एकच खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार,
दिलीप रतनलाल सुराना (६३, रा. बारादारी) यांच्या मालकीची खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत दुकान आहे. या अडत दुकानातील कारकून यांना ९ Hello Khamgaon लाख रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश वटविल्यानंतर कारकून
सचिन तिवारी यांना ही रक्कम सुराना ट्रेडर्स अडत दुकानामध्ये ठेवण्यास सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्याने नऊ लाख रुपये कपाटात ठेवले. त्यानंतर दुकानाच्या बाहेरील ग्रिल गेटला कुलूप लावले. अडत दुकानातील हर्रासीच्या ठिकाणी चावी
आपल्याकडे दिली. ठराविक वेळेनंतर कपाटात रक्कम आढळून न आल्यामुळे दुकानातील सीसी कॅमेरे तपासले. त्यात एक जण कपाटातील रक्कम घेऊन जाताना आढळून आला.