प्रसिद्धीसाठी असाही बनाव, गोळीबार झाल्याची तक्रार आली अंगलट !

0

जळगाव जामोद : प्रसिद्धीसाठी कोणी कोणत्याही थराला जाण्याची शक्यता असते. अशाच एका प्रकरणात प्रसिद्धीसाठी गाडीवर गोळीबार झाल्याची तक्रार एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने जळगाव जामोद पोलिसात दिली. तपासात हा प्रकार बनावट असल्याचे पुढे आल्याने त्या तक्रारकत्यांवरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार २४ जून रोजी घडला होता.

वंधित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रकाश भिसे आणि सुनील बोदडे यांच्या (एमएच-२८ एएन-२९७०) या क्रमांकाच्या चारचाकी गाडीने रात्री नांदुरा येथून परतत होते. खांडवी-आसलगावदरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी गाडीच्या कार्यावर रॉडने हल्ला करीत गोळीबार केला, अशी फिर्याद जळगाव आमोद पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणामुळे तालुक्यासह जिल्हाभरात खळबळ उडाली होती.

त्यासंदर्भात पोलिसांनी तपास केला. त्यामध्ये आढळलेले जिवंत काडतूस सीसीटीव्ही ‘फुटेज’, सीडीआर संशयास्पद पोलिस तपासात मानेगाव कृषी नाक्यावरील सीसीटीरही फुटेर फिर्यादीच्या मोबाइलचे सीडीआर सर्व संशयास्पद आढळून आले. त्यानंतर गाडीच्या काचावर आवडलेले जिवंत काडतूस फॉरेन्सिक तपासणीसाठी नागपूरला पातयाम्यात आले. त्यावरूनही गोळीबार झाला नसल्याचा अहवाल आला. फिर्यादीनी पोलिसांची दिशाभूल केल्याचे दिसून आले बनावट असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे सप्टेंबर रोजी पोलिसांनी दोघांवरही गुन्हे दाखल करत अटक केली. त्यामुळे केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी गोळीबार झाल्याचा बनाव केल्याचे प्रकरण अंगलट आले. प्रकरणातील फिर्यादीच आरोपी बनले आहेत.

या गुन्ह्यात आधी दाखल असलेल्या कलमामध्ये आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम १२० ३ आणि १७७ अन्वये गुन्हा नौदवण्यात आला.

Share Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *